आनंद नारायण
श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य) श्री नारायण महाराज जालवणकर जन्म: झाशीजवळ जालवण येथे देशस्थ ऋग्वेदी कुटुंबात वडिल: तात्या पुराणिक कार्यकाळ: १८०७ - १८६७ संप्रदाय: साहसागर गुरु: गोवर्धनबाबा मधुरा हटयोगी (वय वर्षे ३५०) विशेष: सन्यासानंतरचे नांव त्रिविक्रमाचार्य शिष्य: नारायण बाबा रत्नागिरी सखाराम बाबा कल्याण राधाकृष्ण तोरणे - मुंबई लक्ष्मण बाबा - इंदूर जन्म व पार्श्वभुमी झांशीजवळ जालवण गावी श्री तात्या पुराणिक नावाचे सदाचरणी देशस्थ ब्राह्मण राहात होते. त्यांच्या पत्नी सुद्धा अतिशय सुशील होत्या. जालवणच्या राजाकडून तात्यांना पुराणे वाचनाचे ८००रु. चे उत्पन्न मिळत असे. तेही वार्षिक; पण संसार सुखाने चालू होता. मात्र त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. एकदा त्यांच्या पत्नी सूर्यनारायणाची पूजा करीत होत्या. त्यावेळी एक योगी आले होते आणि त्यांना विचारू लागले, की “बाई तू हे काय करीत आहेस?” त्या म्हणाल्या, “मी सूर्यनारायणाची पूजा करीत आहे.” तेव्हा योगीराज म्हणतात. तुझ्या घरी पुत्ररूपाने न...