Posts

Showing posts from September, 2022

सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला l

Image
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला l आनंदे कोंदला मागे पुढे ll१ll संगाती पंगती देवासवे घडे l नित्यानित्य पडे तेची साचा ll२ll  समर्थांच्या घरी सकळ संपदा l नाही तुटी कदा कासयाची ll३ll  तुका म्हणे येथे लाभाचीया कोटी l बहु वाव पोटी समर्थांच्या ll४ll  🍁🌻भावार्थ 🌻🍁 प्रेमसुखचा व्यवहार करतांना तो इतका लाभदायक झाला की मागे पुढे सर्वत्र आनंदी आनंद च भरून राहिल आहे. १. त्यामुळे आता आम्हास देवाचीच संगत व पंगत लाभली असून सर्व नित्य व अनित्य वस्तू त्या देवाच्या एकाच साच्यात ओतल्या आहेत असे अनुभवास येते. २. या समर्थांच्या घरी सर्व प्रकारची संपती आहे. कोणत्याही वस्तूची कमतरता म्हणून कधी नसते. 3. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे या देवाच्या घरी अतिशय लाभ होणारा असून या समर्थांच्या पोटामध्ये पुष्कळच जागा आहे. ४. ‼️ जय जय रामकृष्ण हरी ‼️