Posts

Showing posts from 2019

झाला प्रेतरूप शरीराचा भाव

Image
झाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव स्मशानींचा ।। १ ।। रडती रात्रंदिवस कामक्रोध माय । म्हणती हायहाय यमधर्म ।। २ ।। वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेंसी ।। ३ ।। फिरविला घट फोडिला चरणी । महावाक्य ध्वनी बोंब झाली ।। ४ ।। दिली तिळांजुळी कुळनामरुपासी । शरीर ज्याचे त्यासी समर्पिलें ।। ५ ।। तुका म्हणे रक्षा झाली आपीआप । उजळीला दीप गुरुकृपा ।। ६ ।। तुकाराम महाराज म्हणतात माझे शरीर आता जवळ जवळ प्रेतरूप झाले असून त्याचा भावदेखील आता मेल्यासारखा झाला आहे त्यामुळे त्याला आता स्मशानाचे वेध लागले आहेत. ते म्हणतात आणि माझ्या शरीरात राहणाऱ्या कामक्रोधरूपी माय आता आक्रोश करू लागल्या आहेत कारण यमधर्माच्या निमयाप्रमाणे त्यांना त्यांच्या वागणुकीच्या परिणामांचे भीतीदायक चित्र दिसू लागले आहे त्यामुळे घाबरून जाऊन त्याच्या नावाने ते हायहाय करत आहेत. ते म्हणतात माझ्या शरीराला वैराग्यरुपी गोवऱ्या चिकटल्या असून तेथे ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित झाला आहे व त्याच्या झळा ब्रह्मतत्वाला लागत आहेत. आणि अशारितीने ह्या शरीराच्या नावाने शेवटी नारायणाच्या चरणांवर घट फोडून 'मी ब्रह्म...

चिरंजीवपद

Image
 ।। हरी ॐ तत्सत ।। संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजकृत                       ।। सार्थ चिरंजीवपद ।।                        (साधकांना धोक्याची सूचना) चिरंजीव पद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी । किंचित बोलेन निश्चयेंसी । कळावयासी साधका ॥१॥ "चिरंजीवपद" म्हणजे अविनाशी व अवीट असे निरतिशय-आनंदरूप-मोक्ष सुख ! याची प्राप्ती होण्यासाठी साधकाला कोणता अधिकार लागतो. हे त्यांना समजण्यासाठी निश्चयपूर्वक थोडेसे सांगतो. ।।१।। आधीं पाहिजे अनुताप । तयासें कैसें स्वरुप । नित्य मृत्यु जाणे समीप । न मनीं अल्प देह सुख ॥२॥ यात मुख्यतः 'अनुताप' (म्हणजे प्राप्त परिस्थिती अनिष्ट म्हणून तळमळ व इष्ट परिस्थितीची अनिवार ओढ) पाहिजे असतो. त्या अनुतापाचे स्वरूप काय? तर मृत्यू केव्हा उडी घालील याचा नेम नाही. असे जाणून तो देहविषयक सुखलालसा सोडून देतो. ।।२।। म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला । तो म्यां विषय भोगी लाविला । थिता परमार्थ हातीचा गेला । करीं वहिला विचार ॥३॥ तो म्हणतो, देवाने हा...