श्री दत्तात्रयांचे दर्शन झाले!

समर्थ गावोगावी फिरत असताना एक दिवशी मातापुरी या गावी आले. तेथे गुरु दत्तात्रयांचे स्थान होते. तेथे आले, तेव्हा त्यांना तेथे अकरा ब्राम्हण अनुष्ठाण करीत असताना दिसले. ते पाहुन समर्थ त्यांच्याजवळ जाउन त्यांना म्हणाले, आपण हे अनुष्ठान कश्यासाठी करीत आहात? तेव्हा त्या अकरा ब्राम्हणांमधील मुख्य ब्राम्हण म्हणाला, आम्ही श्रीगूरुदेव दत्तात्रय महाराजांचे दर्शन व्हावे, म्हणुन हे अनुष्ठान करीत आहोत! तेव्हा समर्थ त्यांना म्हणाले, वा! फार छान योग जुळुन आलेला आहे, आपल्यामुळे मलाही गुरुदेवांचे दर्शन होइल! असे म्हणत आपल्या बरोबर असलेल्या उध्दवाला घेउन समर्थ एका झाडाखाली येउन बसले. त्याच वेळी एक फकीर तेथे अला. त्याच्याबरोबर त्याची बायको, तीन मुले आणि पंचवीस कोंबडे, सहा बकर्या, तसेच एक मोठा रेडा होता. एक मोठा हंडाही होता, तेथुन जवळच थांबल्यावर तो आतल्या पत्नीला म्हणाला, बेगम खाना पकाने के लिये यह जगह बहुत अच्छी है! तुम जल्दी खाना पकाना शुरु करो! आपल्या नवर्याने असे सांगताच ती स्त्री चुल पेटवायला लागली. चुलीवर पाणी भरलेला मोठा हंडा ठेवला. चुल चांगली पेटल्यावर तिने आपल्य...