श्री दत्तात्रयांचे दर्शन झाले!
समर्थ गावोगावी फिरत असताना एक दिवशी मातापुरी या गावी आले. तेथे गुरु दत्तात्रयांचे स्थान होते. तेथे आले, तेव्हा त्यांना तेथे अकरा ब्राम्हण अनुष्ठाण करीत असताना दिसले. ते पाहुन समर्थ त्यांच्याजवळ जाउन त्यांना म्हणाले,
आपण हे अनुष्ठान कश्यासाठी करीत आहात?
तेव्हा त्या अकरा ब्राम्हणांमधील मुख्य ब्राम्हण म्हणाला,
आम्ही श्रीगूरुदेव दत्तात्रय महाराजांचे दर्शन व्हावे, म्हणुन हे अनुष्ठान करीत आहोत! तेव्हा समर्थ त्यांना म्हणाले, वा! फार छान योग जुळुन आलेला आहे, आपल्यामुळे मलाही गुरुदेवांचे दर्शन होइल!
असे म्हणत आपल्या बरोबर असलेल्या उध्दवाला घेउन समर्थ एका झाडाखाली येउन बसले. त्याच वेळी एक फकीर तेथे अला. त्याच्याबरोबर त्याची बायको, तीन मुले आणि पंचवीस कोंबडे, सहा बकर्या, तसेच एक मोठा रेडा होता. एक मोठा हंडाही होता, तेथुन जवळच थांबल्यावर तो आतल्या पत्नीला म्हणाला, बेगम खाना पकाने के लिये यह जगह बहुत अच्छी है! तुम जल्दी खाना पकाना शुरु करो!
आपल्या नवर्याने असे सांगताच ती स्त्री चुल पेटवायला लागली. चुलीवर पाणी भरलेला मोठा हंडा ठेवला. चुल चांगली पेटल्यावर तिने आपल्या पतीला विचारले,
अब हंडीमे पहले क्या डालु?
त्यावर तिचा नवरा म्हणाला,
मुर्गे काटकर डालो!
मग तिने आपल्याजवळील धारदार सुरीने कोंबडे कापुन त्या हंडीत टाकले. तेव्हा पण ती हंडी रिकामीच राहिली. तिने पुन्हा विचारल्यावर तो म्हणाला. अभि लडकोंको काटके डाल! तसे केल्यावर तरीही ती हंडी रिकामीच मग तो म्हणाला, अब रेडा काटके डाल! तसे केल्यावर हंडी रिकामीच, म्हणुन तो म्हणाला.अब सब बकरी काटके डाल!
तसेच केल्यावर हंडी रिकामी पाहुन तिने अब क्या डालु? असे विचारल्यावर तो फकीर म्हणाला अब, सामणे जो बम्मण बैठे है, उनको काटके डाल दे!
असे त्याने म्हणताच ती स्त्री आपल्या हातात सुरी घेउन त्या ब्राम्हणांजवळ येउ लागली.तिला पाहताच ते सर्व अकरा ब्राम्हण आपले अनुष्ठान थांबवुन पळु लागले.दुर जाउन उभे राहिले. कारण ती स्त्री त्यांनाही कापुन काढल्याशिवाय राहिली नसती.
ते ब्राम्हण पळुन गेलेले पाहताच तो फकीर आपल्या पत्नीला म्हणाला ठीक है, वो बम्मन भाग गये तो पेड के निचे जो दो आदमी बैठे है, उनको काॅटो! ती स्त्री हातात सुरी घेउन पुढे येत होती, ती समर्थाच्या जवळ येत असतानाच जवळ बसलेला उध्दव लगेच पुढे झाला. आणि त्या स्त्रीला म्हणाला पहले मुझे काटो! असे म्हणुन उध्दव तिच्या समोर बसला आणि त्याने आपली मान तिच्यापुढे केली. आता त्या साधुला ती स्त्री कापणार असेच समोर उभे असलेल्या त्या अकरा ब्राम्हणांना वाटत होते.
पण त्याच वेळी चमत्कार झाला. त्या फकीराच्या भोवती तेजस्वी प्रकाशवलय निर्माण झाले, आणि त्याच्याजागी आता साक्षात गुरुदेव दत्त दिसु लागले. त्याच वेळी ती स्त्री, ती हंडी, ती चुल सारे काही अदृश्य झाले होते.
मग समर्थानी गुरुदत्ताची यथासांग पुजा केली. उध्दवाने नमस्कार केला. तेव्हा गुरुदेव समर्थाना म्हणाले, आपणाला तर मी केव्हाही दर्शन देउ शकतो, त्या ब्राम्हणांजवळ कशासाठी बसलात?
त्यावर समर्थ म्हणाले, माझ्यामुळे तरी त्या अकरा ब्राम्हणांना आपले दर्शन व्हावे, म्हणुन!
मग दत्तात्रय म्हणाले, जे स्वार्थासाठी माझे अनुष्ठान करतात, त्यांना मी कधिही दर्शन देत नसतो पण तुमचा काहिच स्वार्थ नव्हता, म्हणुन तुम्हाला दर्शन दिले.
हे सर्व पाहुन ते अकारा ब्राम्हण समोर येउन उभे राहिले, त्यांना दत्तात्रयांनी दर्शन दिले. दत्तात्रय अंतर्धान पावल्यावर ते ब्राम्हण समर्थाना म्हणाले,
आम्ही आपल्याला ओळखले नाही. आम्ही जीवाच्या भितीने पळुन गेलो. पण आपली भक्ती श्रेष्ठ आहे. यापुढे आपणच आमचे गुरु आहात!
श्री समर्थानी मग त्या ब्राम्हणांना अनुग्रह दिल्याने ते सर्व जण समर्थाचे शिष्य झाले...
Comments
Post a Comment