परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटीं देह तैसा ॥ १ ॥
।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।।
🔴अभंग एकोणिसावा🔴
परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटीं देह तैसा ॥ १ ॥
घडीघडी काळ वाट याची पाहे । अजून किती आहे अवकाश ॥ २ ॥
हाचि अनुताप घेऊन सावध ।

कांहीं तरी बोध करीं मना ॥ ३ ॥
एक तास उरला खट्वांग रायासी । भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ॥ ४ ॥
सांपडला हरि तयाला साधनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
🍁🌾🍁भावार्थ🍁🌾🍁
फुलातील सुगंध निघून गेल्यावर ते जसे देठावर (सुगंधीहीन) राहते. त्याप्रमाणे आयुष्य संपल्यावर देह चैतन्य हीन राहतो. ।।१।।
या देहाला नेण्याचा अजून किती अवकाश आहे. याची कळीकाळ घाटकोघटकी वाट पाहत असतो. ।।२।।
हाच विचार मनात घेऊन सावध हो आणि मनाला काहीतरी बोध कर. (जागृती दे.) ।।३।।
खट्वांग राजाचे एक तासाचेच आयुष्य उरले होते पण तेवढ्याच काळात त्याला केवढी भाग्य दशा प्राप्त झाली. ।।४।।
त्याला तेवढ्याच अवकाशात त्याने केलेल्या साधनाने हरीची प्राप्ती झाली. म्हणून तुम्ही हरी म्हणा, असे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात. ।।५।।
🌻🙏आपला दासानुदास 🙏🌻

Comments
Post a Comment