पूर्वजांसी नरका । जाणें तें एक आइका ।।१।।

       🌾🌾अभंग 🌾🌾

     पूर्वजांसी नरका ।
     जाणें तें एक आइका ।।१।।

     निंदा करावी चाहाडी ।
     मनीं धरूनि आवडी ।।२।।

     मात्रागमना ऐसी ।
     जोडी पातकांची राशी ।।३।।

     तुका म्हणे वाट ।
     कुंभ(भी)पाकाची ते नीट ।।४।।

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

     🌻🌻भावार्थ:-🌻🌻
अहो जन हो, तुमच्या पूर्वजांना नरकास घालवावयाचें असेल तर मी सांगतों तें एक ऐका; तें असें. १.
मनांत मोठी प्रीति धरून दुसऱ्याची (विशेषतः वेदांची व संतांची) निंदा करावी व चहाडी सांगावी. २.
त्या योगानें मात्रागमनासारख्या पातकांच्या राशींचा बोजा त्याजवर होतो. ३.
     तुकाराम महाराज म्हणतात,
ही वाट कुंभीपाक नरकाकडे जाण्याची आहे. ४.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥

⛳⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳⛳

💐💐🙏🏻पांडुरंग हरि🙏🏻💐💐

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास