नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥
🕉️‼️ तुका म्हणे‼️🕉️
नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥नेणें राग वेळ काळ घात मात ।
तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥२॥
तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया ॥३॥
🌻🌿भावार्थ🌿🌻
मी गाणे जानत नाही, माझा कंठ सुस्वर नाही; पण हे पांडुरंगा, माझा सर्व भार तुझ्यावर आहे. कोटा राग गाण्यासाठी कोणती वेळ, काळ योग्य की अयोग्य मी हे जानत नाही; पण माझे चित्त मी तुझ्या पायावर वाहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्यावाचून इतर जनांची आवड नाही.
🌺🍁राम कृष्ण हरी 🍁🌺
Comments
Post a Comment