भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

🍃🍃🍃अभंग🍃🍃🍃
भक्त ऐसे जाणा जे देही उदास ।
गेले आशापाश निवरूनी ।।१।।
विषय तो त्याचा झाला नारायण ।
नावडे धन जन माता पिता ।।२।।
निर्वाणी गोविंद असे मागे पुढे ।
काहीच साकडे पडो नेदी ।।३।।
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य ।
घातलीय भये नर्कां जाणे ।।४।।
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जे देह भावाविषयी उदास झाले आहेत व ज्यांचे आशापाश नष्ट झाले आहेत त्यांनाच ईश्वराचे भक्त समजावे. १
त्यांना नारायण हाच एक विषय झालेला असून धन जन माता पिता असा लौकिक आवडेनासा होतो.२.
अशा भक्तांच्या संकट प्रसंगी त्यांना सांभाळणारा गोविंद त्यांच्या मागे पुढे सांभाळीत असतो. तो त्यांना काहीच संकटे पडू देत नाही.३.
तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या कार्याला सर्वांनी साह्य करावे, याविषयी कुणी भय घालेल तर तो नरकातच जाईल.४.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

Comments

  1. जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹

    ReplyDelete
    Replies
    1. जय जय रामकृष्णहरि! हरेकृष्ण! ✨🍎🙇🏻

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास