अनुभवे अनुभव अवघाची साधिला..

🍃🍃🍃अभंग🍃🍃🍃
अनुभवे अनुभव अवघाची साधिला ।
तरी स्थिरावला मनु ठायी ।।१।।
पिटुनिया मुसे आला अळकार ।
दग्ध ते असार होऊनिया ।।२।।
एकचि उरले कायावाचामना ।
आनंद भुवनामाजी त्रयी ।।३।।
तुका म्हणे जिंकीला संसार ।
होऊनि किंकर विठोबाचे ।।४।।
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
अनुभव घेता घेता आम्ही ईश्वरप्राप्तीचा उच्च प्रकारचा अनुभव मिळविला या अनुभवाने आमचे मन त्याच्या पायी आता स्थिर झाले आहे. १.
चुलीमध्ये सोने घातल्यावर ते आटले व त्यातील हिणकस भाग जळून नष्ट झाला व उरलेल्या शुद्ध सोन्याचा अलंकार घडवण्यात आला.२.
त्याप्रमाणे कायावाचामनेकरून सर्वत्र एकच आनंद सर्व त्रिभुवनात उरलेला आहे. ३.
तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या विठोबाचे दास झालो असून त्या योगे सर्व संसार जिंकला आहे.४.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास