याजसाठी केला होता अट्टाहास

🍃🍃🍃अभंग🍃🍃🍃 याजसाठी केला होता अट्टाहास। सेवटीचा दिस गोड व्हावा ।।१।। आत्ता निश्चितीने पावलो विसावा । खुंटलीये धावा तृष्णेचिया ।।२।। कवतुक वाटे जालिया वेचाचे । नाव मंगळाचे तेणे गुणे ।।३।। तुका म्हणे मुक्ती परिणीली नोवरी । आता दिवस चारी खेळीमेळी ।।४।। 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 आयुष्यातील शेवटचे दिवस चांगले जावेत, अंतकाळी ईश्वराच्या चिंतनात काळ सुखाने जावा यासाठीच सर्व खटाटोप केला होता. १. आता निश्चयाने मी निष्काळजी होऊन विश्रांतीचे सुख घेत आहे. या पुढे तृष्णेचि धावाधाव होणार नाही. २. त्या श्रीहरीच्या नामस्मरणात व चिंतनात आतापर्यंत आयुष्य खर्च झाले याचेच मोठे कवतुक वाटते श्रीहरीच्या मंगल नामस्मरणाचाच हा गुण आहे. ३. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी मुक्ती हीच नवरी स्वीकारून तिच्याशी लग्न केले आहे. आता यापुढेचे चार दिवस, उरलेले थोडे दिवस मी तिच्याशी क्रीडा करण्यात घालवणार आहे. ४. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂