Posts

Showing posts with the label Pradeep Tokade's

सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला l

Image
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला l आनंदे कोंदला मागे पुढे ll१ll संगाती पंगती देवासवे घडे l नित्यानित्य पडे तेची साचा ll२ll  समर्थांच्या घरी सकळ संपदा l नाही तुटी कदा कासयाची ll३ll  तुका म्हणे येथे लाभाचीया कोटी l बहु वाव पोटी समर्थांच्या ll४ll  🍁🌻भावार्थ 🌻🍁 प्रेमसुखचा व्यवहार करतांना तो इतका लाभदायक झाला की मागे पुढे सर्वत्र आनंदी आनंद च भरून राहिल आहे. १. त्यामुळे आता आम्हास देवाचीच संगत व पंगत लाभली असून सर्व नित्य व अनित्य वस्तू त्या देवाच्या एकाच साच्यात ओतल्या आहेत असे अनुभवास येते. २. या समर्थांच्या घरी सर्व प्रकारची संपती आहे. कोणत्याही वस्तूची कमतरता म्हणून कधी नसते. 3. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे या देवाच्या घरी अतिशय लाभ होणारा असून या समर्थांच्या पोटामध्ये पुष्कळच जागा आहे. ४. ‼️ जय जय रामकृष्ण हरी ‼️

काय पद्मनीचे षंढासी सोहळे ।

Image
 श्री संत एकनाथ महाराजकृत                         हरिपाठ 🌾🌺 अभंग सतरावा 🌺🌾 काय पद्मनीचे षंढासी सोहळे । वांझेसी डोहाळे कैची होती ॥ १ ॥ अंधापुढें दीप खरासी चंदन । सर्पासी दुधपान करूं नये ॥ २ ॥ क्रोधि अविश्वासी त्यासी बोध कैंचा । व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नये ॥ ३ ॥ खळाची संगती उपयोगासी न ये । आपणा अपाय त्याचे संगे ॥ ४ ॥ वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी । एका जनार्दनीं तेचि भले ॥ ५ ॥ 🍀🌷🌻🍁 भावार्थ 🍁🌻🌷🍀 नपुंसकाला पद्मिनीचे सोहळे काय? वांज स्त्रीला डोहाळे कुठले होणार? ।।१।। आंधळ्यांपुढे दिवा ठेऊ नये, गाढवाला चंदन लावू नये, सर्पाला दूधपान करू नये. (कारण तसे केले तरी त्याचा त्यांना काय उपयोग ?) ।।२।। जो क्रोधी अविश्वासी आहे त्यास बोध कोठून होणार? म्हणून त्याला बोध करून आपल्या वाणीला शिण देऊ नये. ।।३।। दुष्ट  लोकांची संगती आपल्याला केव्हाही उपयोगी पडणार नाही. उलट त्यामुळे आपला घात मात्र होईल. ।।४।। जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, ज्या वैष्णवांनी असे हे कुपथ्य दूर फेकून दिले तेच शहाणे होत. ।।५।। 🌼🙏आपल...

नाकळे तें कळे कळे तें नाकळे । वळे तें ना वळें गुरुविणें ॥ १

Image
        🔴अभंग बारावा🔴 🙏।। ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।।🙏 नाकळे तें कळे कळे तें नाकळे । वळे तें ना वळें गुरुविणें ॥ १ ॥ निर्गुण पावलें सगुणीं भजतां । विकल्प धरितां जिव्हा झडे ॥ २ ॥ बहुरूपी घरी संन्यासाचा वेष । पाहोन तयास धन देती ॥ ३ ॥ संन्याशाला नाहीं बहुरूपियाला । सगुणीं भजला तेथें पावे ॥ ४ ॥ अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥ ५ ॥ 🌷🌻🍁 भावार्थ🍁🌻🌷 हरीला ओळखून त्याला आपल्या पोटात साठवले, अशाला हरीची भेट झाल्यावर आता दुःख कुठले. ।।१।। पुरुष असो अथवा स्त्री असो, मग ते दुराचारी का असेनात ! जो मुखाने हरीचा जप करील तो पवित्रच होय. ।।२।। जो नित्य नियमाने मुखाने हरीचा जप करतो त्याचे कुळ पवित्र होय व त्याला जन्म देणारी आईही धन्य होय. ।।३।। ज्याच्या अंतःकरणात काम, क्रोध, लोभादि विकार आहेत असा मनुष्य येथे अधिकारी नाही. ।।४।। जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरी स्मरण करणे हे जे वैष्णवांचे गुह्य आहे; ते मी निवडून काढले म्हणून तुम्ही हरी म्हणा..!!

आतां झालों उतराई।

Image
🚩🕉️‼️श्री विठ्ठल‼️🕉️🚩            🌺🌺 अभंग🌺🌺 तुका म्हणे.. मजपुढें नाहीं आणीक बोलता। ऐसें कांहीं चित्ता वाटतसे।।१।। याचा कांहीं तुम्हीं देखावा परिहार। सर्वज्ञ उदार पांडुरंगा।।२।। कामक्रोधें नाहीं सांडिलें आसन। राहिले वसोन देहामध्यें।।३।। तुका म्हणे आतां झालों उतराई। कळों यावें पायीं निरोपिलें।।४।। 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷      भावार्थ:- माझ्याप्रमाणें बोलका प्राणी कोणी नाहीं असें जें कांहीं माझ्या चित्तास वाटत आहे.      तें नाहींसें करण्याचा हे पांडुरंगा, तुम्ही कांहीं विचार पाहा. तुम्ही सर्व जाणणारे उदार आहां.      माझ्या देहाचे ठिकाणीं काम-क्रोधांनीं वास्तव्य केलें आहे. ते तें आसन सोडून कोठें जात नाहींत.      तुकाराम महाराज म्हणतात,माझ्या अंत:करणाची जी स्थिती आहे ती तुमचे पायांजवळ ठेवून मी उत्तीर्ण झालों आहें हें आपल्याला कळावें.    ⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳