Posts

नीचपण बरवे देवा

Image
             अभंगवाणी नीचपण बरवे देवा । न चले कोणाचाही दावा ।। महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे राहाती ।। येता सिंधूच्या लहरी । नम्र होता जाती वरी ।। तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ।। हे देवा, लहानपण, हलकेपणच मला फार चांगले वाटते. कारण लहानपणाचा कुणीही मत्सर करीत नाही, कुणी हेवा दावा साधित नाही. ।।१।। पाहा ना, नदीला महापूर आला तर मोठमोठी झाडे वाहून जातात, मोडून पडतात; पण नम्रपणाने पाण्याखाली वाकणारे लव्हाळ्याचे गवत मात्र वाचते. ।।२।। सागराच्या मोठमोठ्या लाटा जरी उसळल्या तरी त्याच्या पुढे नम्र होतात त्या त्याच्या पाठीवरून जातील व त्यांच्या जिविताचे रक्षण होईल. ।।३।। तुकाराम महाराज म्हणतात सर्वात खाली असणारे पाय मनोभावे धरल्यास मोठ मोठ्या बलवान मानसाचेही मग काही चालत नाही, असे नम्र होण्यातील वर्म आहे. ।।४।।

झाला प्रेतरूप शरीराचा भाव

Image
झाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव स्मशानींचा ।। १ ।। रडती रात्रंदिवस कामक्रोध माय । म्हणती हायहाय यमधर्म ।। २ ।। वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेंसी ।। ३ ।। फिरविला घट फोडिला चरणी । महावाक्य ध्वनी बोंब झाली ।। ४ ।। दिली तिळांजुळी कुळनामरुपासी । शरीर ज्याचे त्यासी समर्पिलें ।। ५ ।। तुका म्हणे रक्षा झाली आपीआप । उजळीला दीप गुरुकृपा ।। ६ ।। तुकाराम महाराज म्हणतात माझे शरीर आता जवळ जवळ प्रेतरूप झाले असून त्याचा भावदेखील आता मेल्यासारखा झाला आहे त्यामुळे त्याला आता स्मशानाचे वेध लागले आहेत. ते म्हणतात आणि माझ्या शरीरात राहणाऱ्या कामक्रोधरूपी माय आता आक्रोश करू लागल्या आहेत कारण यमधर्माच्या निमयाप्रमाणे त्यांना त्यांच्या वागणुकीच्या परिणामांचे भीतीदायक चित्र दिसू लागले आहे त्यामुळे घाबरून जाऊन त्याच्या नावाने ते हायहाय करत आहेत. ते म्हणतात माझ्या शरीराला वैराग्यरुपी गोवऱ्या चिकटल्या असून तेथे ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित झाला आहे व त्याच्या झळा ब्रह्मतत्वाला लागत आहेत. आणि अशारितीने ह्या शरीराच्या नावाने शेवटी नारायणाच्या चरणांवर घट फोडून 'मी ब्रह्म...

चिरंजीवपद

Image
 ।। हरी ॐ तत्सत ।। संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजकृत                       ।। सार्थ चिरंजीवपद ।।                        (साधकांना धोक्याची सूचना) चिरंजीव पद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी । किंचित बोलेन निश्चयेंसी । कळावयासी साधका ॥१॥ "चिरंजीवपद" म्हणजे अविनाशी व अवीट असे निरतिशय-आनंदरूप-मोक्ष सुख ! याची प्राप्ती होण्यासाठी साधकाला कोणता अधिकार लागतो. हे त्यांना समजण्यासाठी निश्चयपूर्वक थोडेसे सांगतो. ।।१।। आधीं पाहिजे अनुताप । तयासें कैसें स्वरुप । नित्य मृत्यु जाणे समीप । न मनीं अल्प देह सुख ॥२॥ यात मुख्यतः 'अनुताप' (म्हणजे प्राप्त परिस्थिती अनिष्ट म्हणून तळमळ व इष्ट परिस्थितीची अनिवार ओढ) पाहिजे असतो. त्या अनुतापाचे स्वरूप काय? तर मृत्यू केव्हा उडी घालील याचा नेम नाही. असे जाणून तो देहविषयक सुखलालसा सोडून देतो. ।।२।। म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला । तो म्यां विषय भोगी लाविला । थिता परमार्थ हातीचा गेला । करीं वहिला विचार ॥३॥ तो म्हणतो, देवाने हा...

श्री तुकाराम महाराजकृत हरिपाठ

Image
तुकाराममहाराजकृत हरिपाठाचे अभंग १ नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ॥ १ ॥ गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आल्या स्तुतीला द्यावी मती ॥ २ ॥ गुरुराया तुजाइसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ॥ ४ ॥ २ पहाटेच्या प्रहरीं म्हणा हरि हरी । तया सुखा सरी नाहीं दुजें ॥ १ ॥ केशव वामन नारायण विष्णु । कृष्ण संकर्षणु राम राम ॥ २ ॥ माधवा वामना श्रीधरा गोविंदा । अच्युत मुकुंदा पुरुषोत्तमा ॥ ३ ॥ नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा । हृषीकेशा पावा स्मरणमात्रें ॥ ४ ॥ तुका म्हणे एका नामीं भाव । राहे होय साह्य पांडुरंग ॥ ५ ॥ ३ अयोध्या मथुरा काशी अवंतिका । कांची हे द्वारका माया सत्य ॥ १ ॥ मोक्ष पुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे । प्राणी तो उद्धरे स्मरणमात्रें ॥ २ ॥ नित्य नित्य मनीं हरि आठवावा । तेणेंचि तरावा भवसिंधु ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा । राहील जो नेमा तोचि धन्य ॥ ४ ॥ ४ यमुना कावेरी गंगा भगीरथी । कृष्णा सरस्वती तुंगभद्रा ॥ १ ॥ नर्मदा आठवी व...

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजकृत हरिपाठ

Image
श्रीनिवृत्तिमहाराजकृत हरिपाठाचे अभंग १ हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं । अखंड श्रीपती नाम वाचे ॥ १ ॥ रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती । नित्य नामें तृप्ती जाली आम्हां ॥ २ ॥ नामाचेनि स्मरणें नित्य पैं सुखांत । दुजीयाची मात नेणो आम्ही ॥ ३ ॥ निवृत्ति जपतु अखंड नामावळी । हृदयकमळीं केशीराज ॥ ४ ॥ २ हरिविण चित्तीं न धरीं विपरीत । तरताती पतित रामनामें ॥ १ ॥ विचारुनी पाहा ग्रंथ हे अवघे । जेथें तेथें सांग रामनाम ॥ २ ॥ व्यासादिक भले रामनामापाठीं । नित्यता वैकुंठीं तयां घर ॥ ३ ॥ शुकादिक मुनि विरक्त संसारीं । रामनाम निर्धारीं उच्चारिलें ॥ ४ ॥ चोरटा वाल्मीकि रामनामीं रत । तोही एक तरत रामनामीं ॥ ५ ॥ निवृत्ति साचार रामनामी दृढ । अवघेचि गूढ उगविले ॥ ६ ॥ ३ हरिमार्ग सार येणेंचि तरिजे । येरवीं उभिजे संसार रथ ॥ १ ॥ जपतां श्रीहरी मोक्ष नांदे नित्य । तरेल पैं सत्य हरि नामें ॥ २ ॥ काय हें ओखद नामनामामृत । हरिनामें तृप्त करी राया ॥ ३ ॥ निवृत्ति साचार हरिनाम जपत । नित्य हृदयांत हरी हरी ॥ ४ ॥ ४ एकेविण दुजें नाहीं पैं ये ...

श्री नामदेव महाराजकृत हरिपाठ

Image
श्रीनामदेवमहाराजकृत हरिपाठाचे अभंग १ नामाचा महिमा कोण करी सीमा । जपावें श्रीरामा एका भावें ॥ १ ॥ न लगती स्तोत्रें नाना मंत्रें यंत्रें । वर्णिजे बा वक्त्रें श्रीरामनाम ॥ २ ॥ अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत ॥ ३ ॥ नामा म्हणें नाम महाजप परम । तो देह उत्तम मृत्युलोकीं ॥ ४ ॥ २ जन्माचें कारण रामनामपाठीं । जाइजे वैकुंठीं एकीहेळा ॥ १ ॥ रामनाम ऐसा जिव्हे उमटे ठसा । तो उद्धरेल आपैसा इहलोकीं ॥ २ ॥ दो अक्षरीं राम जप हा परम । नलगे तुज नेम नाना पंथ ॥ ३ ॥ नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र । उद्धरिते गोत्र पूर्वजेंसी ॥ ४ ॥ ३ विषयांचे कोड कां करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥ १ ॥ सर्वही लटिकें जाण तूं बा निकें । रामाविण एकें न सुटिजे ॥ २ ॥ मायाजाळ मोहें इंद्रियांचा रोहो । परि न धरेचि भावो भजनपंथें ॥ ३ ॥ नामा म्हणे देवा करीं तूं लावलाही । मयूराचा टाहो घनगर्जना ॥ ४ ॥ ४ कांसवीचे दृष्टी जैं येईजे भेटी । तैं अमृताची सृष्टी घडे त्यासी ॥ १ ॥ तैसें हें भजन श्रीरामाचें ध्यान । वाचे नारा...

श्री ज्ञानेश्वर महाराजकृत हरिपाठ

Image
श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत हरिपाठाचे अभंग ॥ श्री गणेशाय नमः ॥ १ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४ ॥ २ चहूं वेदीं जाण षट्शास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १ ॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तूं दुर्गमा न घालीं मन ॥ ३ ॥ पाठभेद -वायां दुर्गमी न घालीं मन ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥ ३ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥ सगुण निर्गुण गुणांचें अगुण । हरिविणें मत व्यर्थ जाय ॥ २ ॥ अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार । जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३ ॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४ ४ भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । ...