पूर्वजांसी नरका । जाणें तें एक आइका ।।१।।
🌾🌾अभंग 🌾🌾 पूर्वजांसी नरका । जाणें तें एक आइका ।।१।। निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ।।२।। मात्रागमना ऐसी । जोडी पातकांची राशी ।।३।। तुका म्हणे वाट । कुंभ(भी)पाकाची ते नीट ।।४।। 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 🌻🌻भावार्थ:-🌻🌻 अहो जन हो, तुमच्या पूर्वजांना नरकास घालवावयाचें असेल तर मी सांगतों तें एक ऐका; तें असें. १. मनांत मोठी प्रीति धरून दुसऱ्याची (विशेषतः वेदांची व संतांची) निंदा करावी व चहाडी सांगावी. २. त्या योगानें मात्रागमनासारख्या पातकांच्या राशींचा बोजा त्याजवर होतो. ३. तुकाराम महाराज म्हणतात, ही वाट कुंभीपाक नरकाकडे जाण्याची आहे. ४. 💥💥💥💥💥💥💥💥💥💥 ⛳⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳⛳ 💐💐🙏🏻पांडुरंग हरि🙏🏻💐💐