येथुनिया ठाव । अवघे लक्षायाचे भाव ।

🌹🌻🌻अभंग तुकोबांचे🌹🌹🌻
येथुनिया ठाव । अवघे लक्षायाचे भाव ।।१।।
उंची देवाचे चरण । तेथे जाले अधिष्ठान ।।२।।
आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ।।३।।
तुका म्हणे स्थळ । धरुनी राहिलो अचळ ।।४।।

🌻🌺🌹🌻🌺🌹भाव..🌻🌺🌹🌻🌺🌹
या श्रीहरीचे पाय हे ठिकाणचं असे आहे की, येथून सर्व जगताचे भाव दिसतात. १.
या देवाच्या चरणाचे स्थान उंचावर असून, माझ्या भावाचे अधिष्ठान तेच झाले आहे. २.
विविध प्रकारच्या आघाता पासून निराळें व निर्भय असे हे स्थान आहे. ३.
तुकाराम महाराज म्हणतात, असे हे अढळ स्थान मी मनात धरून राहिलो आहे. ४.
🌻🕉️🌻 राम कृष्ण हरी 🌻🕉️🌻

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास