Posts

Showing posts from February, 2022

परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥

Image
🕉️‼️ एका जर्नादनीं ‼️🕉️  परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥  वसोनिया जिव्हे वदावेम कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२  आणिक संकल्प नाहीं माझे मनीं । एका जर्नादनीं वंदितसें ॥३॥  🌻🌿भावार्थ🌿🌻  आदिमायेचे दर्शन होताच चार ही वाणी नमल्या,  आणि जिव्हेवर आसन मांडून चित्त हरिनाम घेऊ लागले.  जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात,  त्यायोगे माझे मन संकल्प विकल्प सोडून वंदन करू लागले. 🌺🌾राम कृष्ण हरी 🌾🌺

नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥

Image
🕉️‼️ तुका म्हणे‼️🕉️ नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥ नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥२॥ तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया ॥३॥ 🌻🌿भावार्थ🌿🌻 मी गाणे जानत नाही, माझा कंठ सुस्वर नाही; पण हे पांडुरंगा, माझा सर्व भार तुझ्यावर आहे. कोटा राग गाण्यासाठी कोणती वेळ, काळ योग्य की अयोग्य मी हे जानत नाही; पण माझे चित्त मी तुझ्या पायावर वाहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्यावाचून इतर जनांची आवड नाही. 🌺🍁राम कृष्ण हरी 🍁🌺

पूर्वजांसी नरका । जाणें तें एक आइका ।।१।।

Image
       🌾🌾अभंग 🌾🌾      पूर्वजांसी नरका ।      जाणें तें एक आइका ।।१।।      निंदा करावी चाहाडी ।      मनीं धरूनि आवडी ।।२।।      मात्रागमना ऐसी ।      जोडी पातकांची राशी ।।३।।      तुका म्हणे वाट ।      कुंभ(भी)पाकाची ते नीट ।।४।। 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷      🌻🌻भावार्थ:-🌻🌻 अहो जन हो, तुमच्या पूर्वजांना नरकास घालवावयाचें असेल तर मी सांगतों तें एक ऐका; तें असें. १. मनांत मोठी प्रीति धरून दुसऱ्याची (विशेषतः वेदांची व संतांची) निंदा करावी व चहाडी सांगावी. २. त्या योगानें मात्रागमनासारख्या पातकांच्या राशींचा बोजा त्याजवर होतो. ३.      तुकाराम महाराज म्हणतात, ही वाट कुंभीपाक नरकाकडे जाण्याची आहे. ४. 💥💥💥💥💥💥💥💥💥💥 ⛳⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳⛳ 💐💐🙏🏻पांडुरंग हरि🙏🏻💐💐

परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटीं देह तैसा ॥ १ ॥

Image
।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।। 🔴अभंग एकोणिसावा🔴 परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटीं देह तैसा ॥ १ ॥ घडीघडी काळ वाट याची पाहे । अजून किती आहे अवकाश ॥ २ ॥ हाचि अनुताप घेऊन सावध । कांहीं तरी बोध करीं मना ॥ ३ ॥ एक तास उरला खट्वांग रायासी । भाग्यदशा कैसी प्राप्त झाली ॥ ४ ॥ सांपडला हरि तयाला साधनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥ 🍁🌾🍁भावार्थ🍁🌾🍁 फुलातील सुगंध निघून गेल्यावर ते जसे देठावर (सुगंधीहीन) राहते. त्याप्रमाणे आयुष्य संपल्यावर देह चैतन्य हीन राहतो. ।।१।। या देहाला नेण्याचा अजून किती अवकाश आहे. याची कळीकाळ घाटकोघटकी वाट पाहत असतो. ।।२।। हाच विचार मनात घेऊन सावध हो आणि मनाला काहीतरी बोध कर. (जागृती दे.) ।।३।। खट्वांग राजाचे एक तासाचेच आयुष्य उरले होते पण तेवढ्याच काळात त्याला केवढी भाग्य दशा प्राप्त झाली. ।।४।। त्याला तेवढ्याच अवकाशात त्याने केलेल्या साधनाने हरीची प्राप्ती झाली. म्हणून तुम्ही हरी म्हणा, असे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात. ।।५।। 🌻🙏आपला दासानुदास 🙏🌻