करा रे बापांनो साधन हरीचें । झणीं करणीचें करूं नका ॥ १ ॥

।। ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।।
    
 🔴अभंग विसावा🔴
करा रे बापांनो साधन हरीचें । झणीं करणीचें करूं नका ॥ १ ॥
जेणें बा न ये जन्म यमाची यातना । ऐशिया साधना करा कांहीं ॥ २ ॥
साधनाचें सार मंत्रबीज हरी । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥ ३ ॥
कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरि नाम जपतां घडे ॥ ४ ॥
एका जनार्दनीं न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरूप ॥ ५ ॥
🍀🌷🌻भावार्थ🍁🌷🍀
बाबांनो, ! हरीच्या प्राप्तीचे साधन करा. खोट्या (न टीकणाऱ्या) लाभाचे साधन चुकून सुध्दा करू नका. ।।१।।
ज्या योगाने पुनरपि जन्म प्राप्त होऊन यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, असे कोणते तरी साधन करा. ।।२।।
सर्व साधनांचे सार व सर्व मंत्रांचा बीजमंत्र एक हरिच आहे, तोच आत्मतत्त्व आहे. हे जो मनात धरतो तोच एक धन्य होय. ।।३।।
एक हरीचे नाम घेतले असता ज्याचा अनेक कोटी यज्ञ करण्याचा नियम आहे, त्यांना जे पुण्य घडते ते मिळते. ।।४।।
जनार्दनीं स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, या विषयाशी मनात कोणत्याही प्रकारची शंका बाळगू नये. जो हरिनाम घेतो, तो निश्चयाने हरिरुप होतो. ।।५।।
🌻🙏आपला दासानुदास 🙏🌻

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास