Posts

Showing posts from December, 2018

श्री तुकाराम महाराजकृत हरिपाठ

Image
तुकाराममहाराजकृत हरिपाठाचे अभंग १ नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ॥ १ ॥ गुरुरायाचरणीं मस्तक ठेविला । आल्या स्तुतीला द्यावी मती ॥ २ ॥ गुरुराया तुजाइसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ॥ ३ ॥ तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूंचि कृपासिंधु पांडुरंगा ॥ ४ ॥ २ पहाटेच्या प्रहरीं म्हणा हरि हरी । तया सुखा सरी नाहीं दुजें ॥ १ ॥ केशव वामन नारायण विष्णु । कृष्ण संकर्षणु राम राम ॥ २ ॥ माधवा वामना श्रीधरा गोविंदा । अच्युत मुकुंदा पुरुषोत्तमा ॥ ३ ॥ नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा । हृषीकेशा पावा स्मरणमात्रें ॥ ४ ॥ तुका म्हणे एका नामीं भाव । राहे होय साह्य पांडुरंग ॥ ५ ॥ ३ अयोध्या मथुरा काशी अवंतिका । कांची हे द्वारका माया सत्य ॥ १ ॥ मोक्ष पुऱ्या ऐशा नित्य वाचे स्मरे । प्राणी तो उद्धरे स्मरणमात्रें ॥ २ ॥ नित्य नित्य मनीं हरि आठवावा । तेणेंचि तरावा भवसिंधु ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा । राहील जो नेमा तोचि धन्य ॥ ४ ॥ ४ यमुना कावेरी गंगा भगीरथी । कृष्णा सरस्वती तुंगभद्रा ॥ १ ॥ नर्मदा आठवी व...

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजकृत हरिपाठ

Image
श्रीनिवृत्तिमहाराजकृत हरिपाठाचे अभंग १ हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं । अखंड श्रीपती नाम वाचे ॥ १ ॥ रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती । नित्य नामें तृप्ती जाली आम्हां ॥ २ ॥ नामाचेनि स्मरणें नित्य पैं सुखांत । दुजीयाची मात नेणो आम्ही ॥ ३ ॥ निवृत्ति जपतु अखंड नामावळी । हृदयकमळीं केशीराज ॥ ४ ॥ २ हरिविण चित्तीं न धरीं विपरीत । तरताती पतित रामनामें ॥ १ ॥ विचारुनी पाहा ग्रंथ हे अवघे । जेथें तेथें सांग रामनाम ॥ २ ॥ व्यासादिक भले रामनामापाठीं । नित्यता वैकुंठीं तयां घर ॥ ३ ॥ शुकादिक मुनि विरक्त संसारीं । रामनाम निर्धारीं उच्चारिलें ॥ ४ ॥ चोरटा वाल्मीकि रामनामीं रत । तोही एक तरत रामनामीं ॥ ५ ॥ निवृत्ति साचार रामनामी दृढ । अवघेचि गूढ उगविले ॥ ६ ॥ ३ हरिमार्ग सार येणेंचि तरिजे । येरवीं उभिजे संसार रथ ॥ १ ॥ जपतां श्रीहरी मोक्ष नांदे नित्य । तरेल पैं सत्य हरि नामें ॥ २ ॥ काय हें ओखद नामनामामृत । हरिनामें तृप्त करी राया ॥ ३ ॥ निवृत्ति साचार हरिनाम जपत । नित्य हृदयांत हरी हरी ॥ ४ ॥ ४ एकेविण दुजें नाहीं पैं ये ...

श्री नामदेव महाराजकृत हरिपाठ

Image
श्रीनामदेवमहाराजकृत हरिपाठाचे अभंग १ नामाचा महिमा कोण करी सीमा । जपावें श्रीरामा एका भावें ॥ १ ॥ न लगती स्तोत्रें नाना मंत्रें यंत्रें । वर्णिजे बा वक्त्रें श्रीरामनाम ॥ २ ॥ अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत ॥ ३ ॥ नामा म्हणें नाम महाजप परम । तो देह उत्तम मृत्युलोकीं ॥ ४ ॥ २ जन्माचें कारण रामनामपाठीं । जाइजे वैकुंठीं एकीहेळा ॥ १ ॥ रामनाम ऐसा जिव्हे उमटे ठसा । तो उद्धरेल आपैसा इहलोकीं ॥ २ ॥ दो अक्षरीं राम जप हा परम । नलगे तुज नेम नाना पंथ ॥ ३ ॥ नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र । उद्धरिते गोत्र पूर्वजेंसी ॥ ४ ॥ ३ विषयांचे कोड कां करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥ १ ॥ सर्वही लटिकें जाण तूं बा निकें । रामाविण एकें न सुटिजे ॥ २ ॥ मायाजाळ मोहें इंद्रियांचा रोहो । परि न धरेचि भावो भजनपंथें ॥ ३ ॥ नामा म्हणे देवा करीं तूं लावलाही । मयूराचा टाहो घनगर्जना ॥ ४ ॥ ४ कांसवीचे दृष्टी जैं येईजे भेटी । तैं अमृताची सृष्टी घडे त्यासी ॥ १ ॥ तैसें हें भजन श्रीरामाचें ध्यान । वाचे नारा...

श्री ज्ञानेश्वर महाराजकृत हरिपाठ

Image
श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत हरिपाठाचे अभंग ॥ श्री गणेशाय नमः ॥ १ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४ ॥ २ चहूं वेदीं जाण षट्शास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १ ॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तूं दुर्गमा न घालीं मन ॥ ३ ॥ पाठभेद -वायां दुर्गमी न घालीं मन ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥ ३ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥ सगुण निर्गुण गुणांचें अगुण । हरिविणें मत व्यर्थ जाय ॥ २ ॥ अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार । जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३ ॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४ ४ भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । ...

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

Image
श्री एकनाथमहाराजकृत हरिपाठाचे अभंग १ हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥ १ ॥ हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥ २ ॥ जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगें हरिरूप ॥ ३ ॥ हरिरूप झालें जाणीव हरपले । मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥ ४ ॥ हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥ अर्थ हरि हाच दाही दिशांना भरून राहिलेला आहे. असा श्रीहरीच्या दासांचा अनुभव असतो. (कारण) एक हरीच 'जसा ज्याचा भाव तसा त्याला अनुभवाला येतो. (हरीच्या दासांचा भाव-श्रीहरिच सर्व ठिकाणी व्यापून आहे असा असल्यामुळे तो एक हरीच त्यांना सर्व ठिकाणी अनुभवाला येतो) ।।१।। मुखाने हरी म्हटल्याने हरीच्या दासांची चिंता संपूर्ण नाहीशी होते. यामुळे त्यांना पुनः जन्म घेण्याचे कारण उरत नाही. ।।२।। (कारण) जन्म हा वासनेच्या संगतीमुळे घ्यावा लागतो. पण या हरिदासाची ती वासनाच हरिरुप झाल्याने त्यांना जन्म घेण्याचे कारण उरत नाही ।।३।। हरिदास हे हरीच्या चिंतनाने हरीस्वरूप झाल्यामुळे ज्ञानाचे काम संपले आणि अज्ञान हे तर हरी स्वरूपाच्या ठिकाणी नाहीसे झालेलेच असत...