Posts

आवडीने भावे हरीनाम घेसी

Image
                                                                 ओम एकनाथाय नमः                                                       श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ                                                                  अभंग क्रमांक २३ वा. आवडीने भावे हरीनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।। १ ।। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा । पती तो लक्ष्मीचा जाणतसे ।। २ ।। सकल जीवांचा करितो सांभाळ । तुज मोकलील ऐसे नाही ।। ३ ।। जैशी स्थिती आहे तैशा परी राहे । कौतुक तू पाहे संचिताचे ।। ४।। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरी क...

पिंडी देहस्थिती ब्रम्हांडी पसारा

Image
                                                    ओम नमो एकनाथाय नमः                                             श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ                                                      अभंग क्रमांक २२ वा . पिंडी  देहस्थिती ब्रम्हांडी पसारा । हरिविण सारा व्यर्थ भ्रम ।। १ ।। शुक याज्ञावल्क दत्त कपिल मुनी । हरिसी जाणोनी हरीच झाले ।। २ ।। यारे यारे धरू हरीनाम तारू । भवाचा सागरू भय नाही ।। ३  ।। साधू संत गेले आनंदी राहिले । हरिनामे झाले कृतकृत्य ।। ४ ।। एका जनार्दनी मांडिले दुकान । देतो मोलावीन सर्व वस्तू ।। ५ ।।                    भावार्थ  पिं...

बारा सोळा जनी हरि सी नेणती

Image
                                             ओम नमो एकनाथाय नमः                                         अभंग २१ वा. बारा  सो ळा  जनी  हरि  सी नेणती । म्हणोनी फिरती रात्रंदिवस ।। १   ।। सहस्र मुखाचा वर्णिता भागला । हर्ष जया झाला तेणे सुखे ।। २ ।। वेद जणू गेला पुढे मौनावला । ते गुह्य तुजला प्राप्त कैचे  ।। ३ ।। पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा । दास सत्गुरूचा तोची जाने ।। ४ ।। जाणते नेणते हरीच्या ठिकाणी । एका जनार्दनी हरी बोला ।। ५ ।। भावार्थ  सूर्याच्या बारा कला आणि चंद्राच्या सोळा कला हरीला न जाणता अजुनहि रात्रंदिवस फिरत आहेत . हजार मुखांचा शेष हि हरीचे गुण वर्णन करता करता थकला, परंतु ते वर्णन करण्याच्या सुखानेच त्याला आनंद प्राप्त झाला. वेद हा हरीचे स्वरूप जाणण्याकरिता पुढे सरसावला , परंतु त्याला सुद्धा स्तब्ध बसावे लागले . असे जे गूढ (ते तुल...

सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला l

Image
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला l आनंदे कोंदला मागे पुढे ll१ll संगाती पंगती देवासवे घडे l नित्यानित्य पडे तेची साचा ll२ll  समर्थांच्या घरी सकळ संपदा l नाही तुटी कदा कासयाची ll३ll  तुका म्हणे येथे लाभाचीया कोटी l बहु वाव पोटी समर्थांच्या ll४ll  🍁🌻भावार्थ 🌻🍁 प्रेमसुखचा व्यवहार करतांना तो इतका लाभदायक झाला की मागे पुढे सर्वत्र आनंदी आनंद च भरून राहिल आहे. १. त्यामुळे आता आम्हास देवाचीच संगत व पंगत लाभली असून सर्व नित्य व अनित्य वस्तू त्या देवाच्या एकाच साच्यात ओतल्या आहेत असे अनुभवास येते. २. या समर्थांच्या घरी सर्व प्रकारची संपती आहे. कोणत्याही वस्तूची कमतरता म्हणून कधी नसते. 3. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे या देवाच्या घरी अतिशय लाभ होणारा असून या समर्थांच्या पोटामध्ये पुष्कळच जागा आहे. ४. ‼️ जय जय रामकृष्ण हरी ‼️

करा रे बापांनो साधन हरीचें । झणीं करणीचें करूं नका ॥ १ ॥

Image
।। ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।।       🔴अभंग विसावा🔴 करा रे बापांनो साधन हरीचें । झणीं करणीचें करूं नका ॥ १ ॥ जेणें बा न ये जन्म यमाची यातना । ऐशिया साधना करा कांहीं ॥ २ ॥ साधनाचें सार मंत्रबीज हरी । आत्मतत्त्व धरी तोचि एक ॥ ३ ॥ कोटि कोटि यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरि नाम जपतां घडे ॥ ४ ॥ एका जनार्दनीं न घ्यावा संशय । निश्चयेंसी होय हरिरूप ॥ ५ ॥ 🍀🌷🌻भावार्थ🍁🌷🍀 बाबांनो, ! हरीच्या प्राप्तीचे साधन करा. खोट्या (न टीकणाऱ्या) लाभाचे साधन चुकून सुध्दा करू नका. ।।१।। ज्या योगाने पुनरपि जन्म प्राप्त होऊन यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, असे कोणते तरी साधन करा. ।।२।। सर्व साधनांचे सार व सर्व मंत्रांचा बीजमंत्र एक हरिच आहे, तोच आत्मतत्त्व आहे. हे जो मनात धरतो तोच एक धन्य होय. ।।३।। एक हरीचे नाम घेतले असता ज्याचा अनेक कोटी यज्ञ करण्याचा नियम आहे, त्यांना जे पुण्य घडते ते मिळते. ।।४।। जनार्दनीं स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, या विषयाशी मनात कोणत्याही प्रकारची शंका बाळगू नये. जो हरिनाम घेतो, तो निश्चयाने हरिरुप होतो. ।।५।। 🌻🙏आपला दासानुदास 🙏🌻

परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥

Image
🕉️‼️ एका जर्नादनीं ‼️🕉️  परा पश्यंती मध्यमा वैखरी । नमियेली खरी आदिमाया ॥१॥  वसोनिया जिव्हे वदावेम कवित्व । हरिनामीं चित्त निरंतर ॥२  आणिक संकल्प नाहीं माझे मनीं । एका जर्नादनीं वंदितसें ॥३॥  🌻🌿भावार्थ🌿🌻  आदिमायेचे दर्शन होताच चार ही वाणी नमल्या,  आणि जिव्हेवर आसन मांडून चित्त हरिनाम घेऊ लागले.  जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात,  त्यायोगे माझे मन संकल्प विकल्प सोडून वंदन करू लागले. 🌺🌾राम कृष्ण हरी 🌾🌺

नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥

Image
🕉️‼️ तुका म्हणे‼️🕉️ नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥ नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥२॥ तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया ॥३॥ 🌻🌿भावार्थ🌿🌻 मी गाणे जानत नाही, माझा कंठ सुस्वर नाही; पण हे पांडुरंगा, माझा सर्व भार तुझ्यावर आहे. कोटा राग गाण्यासाठी कोणती वेळ, काळ योग्य की अयोग्य मी हे जानत नाही; पण माझे चित्त मी तुझ्या पायावर वाहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, मला तुझ्यावाचून इतर जनांची आवड नाही. 🌺🍁राम कृष्ण हरी 🍁🌺