नाम घेता वाया गेला । ऐसा कोणी ऐकीला।।

।। श्री सद्गुरूनाथ महाराज की जय।।

नाम घेता वाया गेला । ऐसा कोणी ऐकीला।।
🌻🌾🌺🌻🌾🌺🌻🌾🌺🌻🌾🌺🌻🌾🌺
एकदा सद्गुरूंना "परेपासून वैखरीपर्यंत करावे राम चिंतन" या चरणाचा अर्थ काय? " असे एका साधकाने विचारले. तेव्हा सद्गुरु म्हणाले, "ओठ व जीभ यांची हालचाल करून म्हणजेच वैखरीने नामस्मरण करणे बहुतेकांना सोपे, सोयीचे व लाभदायक असते. वैखरीनें नामघोष करायला अंशांत शक्ती लागते. ती सर्व परिस्थितीत टिक
तेच असे नाही. साधकाला व्यवहारही सांभाळावा लागतो आणि त्यासाठी त्याला इतर बोलावे लागते. व्यक्तिगत किंवा समूहाने नामोच्चार करायला अशा तऱ्हेच्या मर्यादा असतात, म्हणून अखंडजपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मध्यमा, पश्यंती व परस्पर या वाणींनी जप करण्याचा अभ्यास करावा लागत असतो. हळुहळू सवयीने तोंड बंद असून आतल्याआत जीभ हालवून नामस्मरण होऊ लागते. अभ्यास आणखी वाढला म्हणजे नाम मध्यमेत येऊ लागते. जड व सूक्ष्म यांच्या मधली म्हणून या मध्यमा वाणीतून ओठ व जीभ यांची हालचाल नसते ; तर वाणीचे मेंदूतील जे केंद्र तेथे कामाचे सूक्ष्म स्पंदन चालू असते. तेथून या कामाला शारीरिक शक्ती आवश्यक राहात नाही. बाह्या परिस्थितीशी संबंध कमी होऊ लागतो. वैखरीत वा मध्यमेत नाम चालत असता आपण ते कानाने ऎकण्याचा प्रयत्न करीत राहावे. याने एकाग्रता साधण्यासाठी मदत होते. अभ्यास नेटाने चालू राहिला म्हणजे नाम पश्यन्तीमध्ये ह्रदयस्थानी अनुसंधान रूपानें चालते. अखेर ते नाभिस्थानी परवाणीनें केवळ स्फूर्तीरूपाने चालू राहते. मग बोलणे, देहाची हालचाल, स्थिती, व्याधी किंवा बाह्य परिस्थिती या कशाचाही व्यत्यय न होता नाम अखंड चालू राहते."
श्रीगुरुंसारखा असता पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ।।
🙏🙏आपला दासानुदास 🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास