चहूं शून्याचा भेद कैसा पहावा देंही ।

🌹🌾🌹अभंग ज्ञानदेवांचे🌾🌹🌾

चहूं शून्याचा भेद कैसा पहावा देंही ।
ब्रह्मरंध्री निःसंदेही निजवस्तू ।।१।।
सावळे सुकुमार बिंदूचे अंतरी ।
अर्धंमात्रेंवरी विस्तारले ।।२।।
त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट तिसरें ।
औटपिठादी सारें ब्रह्मांडासी ।।३।।
स्थूल, सूक्ष्म, कारणी माया ।
महाकारणाच्या ठाया रीघ करा ।।४।।
निवृत्ती ज्ञानदेव उभयतांचे बोंल ।
आकाश बुबुळी पाहा असें ।।५।।

भाव..!🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻

या देहातच असून चारी अवस्थांचा मायिकपणा कसा ओळखावा?.
व ब्रह्मरंध्रात असंदिग्धपणाने ती ब्रह्म वस्तू कशी पहावी?.
ब्रह्मरंध्रातील त्या सूक्ष्म बिंदूतील अर्धंमात्रेत ही सावळी सुकुमार मूर्ती आहे.
त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट, व औटपीठ ही महाकारण स्थाने आहेत. योगाभ्यासाने स्थूल, सूक्ष्म व कारण देहांचा निरास करून महाकारणात प्रवेश करा.
निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर महाराज यांचे बोलही वरील अर्थाचे स्पष्ट आहेत.
🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
🍃🌻🍃🌻🍃🌻गुरुदेव दत्त🌻🍃🌻🍃🌻🍃🌻

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास