शून्याचा शेवट डोळा पाहा निराळा ।
amrutanubhav 🍃🍂अभंग ज्ञानदेवांचे🍃🍂
🌾🌺🌻🌾🌺🌻🌾🌺🌻🌾
शून्याचा शेवट डोळा पाहा निराळा ।
नीळ बिंदू सांवळा प्रकाशला ।।१।।
ब्रह्म ज्योतिरुप विसावले जेथ ।
अनुभव साद्यंत पहा तुम्ही ।।२।।
ऐसें कैलासनाथे सांगितले पार्वती ।
ज्ञानदेवें निवृत्ती तेचि सांगे ।।३।।
शून्याचा शेवट डोळा पाहा निराळा ।
नीळ बिंदू सांवळा प्रकाशला ।।१।।
ब्रह्म ज्योतिरुप विसावले जेथ ।
अनुभव साद्यंत पहा तुम्ही ।।२।।
ऐसें कैलासनाथे सांगितले पार्वती ।
ज्ञानदेवें निवृत्ती तेचि सांगे ।।३।।
‼️🕉️भावार्थ🕉️‼️
शून्यरुप जो नील बिंदू, त्याचा योगाभ्यासांने अनुभव घ्या. तो तेजोमय आहे, याचं ठिकाणी चैतन्यरूप ब्रह्म जणू काय विसावा घेण्याकरीता आले आहे. त्याचाही अनुभव घ्या. हेच रूप श्रीशंकराने पार्वतीला दाखवले व तेच निवृत्तीनाथांच्या कृपेने मला अनुभवण्यास मिळाले.

असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
‼️राम कृष्ण हरी ‼️
Comments
Post a Comment