Posts

Showing posts from 2021

शरीर दुःखाचें कोठार

Image
||सार्थ तुकाराम गाथा || ||अभंग क्रमांक ||४०३२||                                       **  शरीर दुःखाचें कोठार | शरीर रोगाचे भांडार | शरीर दुर्गंधीची थार | नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ||१|| शरीर उत्तम चांगलें | शरीर सुखाचें घोसुलें | शरीरें साध्य होय केलें | शरीरें साधलें परब्रह्म ||२|| शरीर विटाळाचें आळें | माया मोह पाश जाळें | पतन शरीराच्यामुळें | शरीर काळें व्यापिलें ||३|| शरीर सकळहि शुध्द | शरीर निधींचाहि निध | शरीरें तुटे भवबंध | वसे मध्यभागीं देव शरीरा ||४|| शरीर अविद्येचा बांधा | शरीर अवगुणांचा रांधा | शरीरीं वसे बहुत बाधा |  नाहीं गुण सुधा एक शरीरीं ||५|| शरीरा दुःख  नेदावा भोग | न द्यावें सुख न करीं त्याग | शरीर चोखटें ना चांग | तुका म्हणे वेग करीं हरिभजनीं ||६|| 💫💫भावार्थ💫💫            हे शरीर दुःखाचे कोठार , रोगांचे भांडार ,दुर्गंधीचा आश्रय असून शरीराइतके अपवित्र जगात दुसरे काहीही नाही .||१||           ...

श्री दत्तात्रयांचे दर्शन झाले!

Image
समर्थ गावोगावी फिरत असताना एक दिवशी मातापुरी या गावी आले. तेथे गुरु दत्तात्रयांचे स्थान होते. तेथे आले, तेव्हा त्यांना तेथे अकरा ब्राम्हण अनुष्ठाण करीत असताना दिसले. ते पाहुन समर्थ त्यांच्याजवळ जाउन त्यांना म्हणाले, आपण हे अनुष्ठान कश्यासाठी करीत आहात?  तेव्हा त्या अकरा ब्राम्हणांमधील मुख्य ब्राम्हण म्हणाला,  आम्ही श्रीगूरुदेव दत्तात्रय महाराजांचे दर्शन व्हावे, म्हणुन हे अनुष्ठान करीत आहोत! तेव्हा समर्थ त्यांना म्हणाले, वा! फार छान योग जुळुन आलेला आहे, आपल्यामुळे मलाही गुरुदेवांचे दर्शन होइल!  असे म्हणत आपल्या बरोबर असलेल्या उध्दवाला घेउन समर्थ एका झाडाखाली येउन बसले. त्याच वेळी एक फकीर तेथे अला. त्याच्याबरोबर त्याची बायको, तीन मुले आणि पंचवीस कोंबडे, सहा बकर्या, तसेच एक मोठा रेडा होता. एक मोठा हंडाही होता, तेथुन जवळच थांबल्यावर तो आतल्या पत्नीला म्हणाला, बेगम खाना पकाने के लिये यह जगह बहुत अच्छी है! तुम जल्दी खाना पकाना शुरु करो!  आपल्या नवर्याने असे सांगताच ती स्त्री चुल पेटवायला लागली. चुलीवर पाणी भरलेला मोठा हंडा ठेवला. चुल चांगली पेटल्यावर तिने आपल्य...

येथुनिया ठाव । अवघे लक्षायाचे भाव ।

Image
🌹🌻🌻 अभंग तुकोबांचे 🌹🌹🌻 येथुनिया ठाव । अवघे लक्षायाचे भाव ।।१।। उंची देवाचे चरण । तेथे जाले अधिष्ठान ।।२।। आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ।।३।। तुका म्हणे स्थळ । धरुनी राहिलो अचळ ।।४।। 🌻🌺🌹🌻🌺🌹भाव..🌻🌺🌹🌻🌺🌹 या श्रीहरीचे पाय हे ठिकाणचं असे आहे की, येथून सर्व जगताचे भाव दिसतात. १. या देवाच्या चरणाचे स्थान उंचावर असून, माझ्या भावाचे अधिष्ठान तेच झाले आहे. २. विविध प्रकारच्या आघाता पासून निराळें व निर्भय असे हे स्थान आहे. ३. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे अढळ स्थान मी मनात धरून राहिलो आहे. ४. 🌻🕉️🌻 राम कृष्ण हरी 🌻🕉️🌻

सहस्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचेंं घर ।

Image
🙏🙏अभंग ज्ञानदेवांचे🙏🙏  सहस्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचेंं घर । सत्रावी निरंतर वसे जेथेंं ।।१।। रक्त शुभ्रवर्ण नीळ पीत दिसेंं । दृष्टी शुद्ध असेंं तयामध्येंं ।।२।। फार किती सांगो सज्ञान तुम्ही जन । अर्थ तुम्ही समजोन मौन्य धरा ।।३।। गुह्याचेही गुह्य निवृत्तीनेंं दाविलेंं । मीच वाचा हो बोलेंं बोलतसेंं ।।४।। 🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹 भाव..! 🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂 नीळबिंदुरुप ब्रह्माचे स्थान सहस्रदळातील ब्रह्मरंध्र होय. सत्रावि म्हणून जे अमृत सरोवर आहे, तेही त्याच ठिकाणी आहे. जरी त्या ज्योतीचा रंग बाहेरून तांबडा, पांढरा, निळा, पिवळा, दिसत असला तरी ती शुद्ध स्वरूपच आहे. तुम्ही लोक सज्ञान आहां, तुम्हाला फार काय सांगावे.! वरील खुणांचे तात्पर्य लक्षांत घेऊन मौन धरा. असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही गुह्यातील गुह्य अशी ज्योत निवृत्तीनाथांनी मला दाखवली, व ती मी शब्दाने तुम्हाला सांगतो. 🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹 🍃🌻🍃🌻गुरुदेव दत्त🌻🍃🌻🍃 वरील फोटो :- बंडोबा बाबा यांचा आहे..

आकाश जे दिसे दृष्टीचीया पोटी।

Image
🌴🌾🌴अभंग ज्ञानदेवांचे🌴🌾🌴 🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹 आकाश जे दिसे दृष्टीचीया पोटी। शून्यत्वासी घोटीं चैतन्यांत ।।१।। अर्थ पाहता सांकडे ऐंकता । कैसें करूं आता निवृत्ती सांगे ।।२। सांगतांची गुज देखिले नयनीं । हिंडताती मौनी याची लागी ।।३।। ज्ञानदेवाचा अर्थ कुटस्थ परिपूर्ण । अपूर्ण ही पूर्ण होय जेथें ।।४।। 🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻 भाव.. 🌻🌾🌺🍂🌻🌾🌺🍂🌻🌾🌺🍂🌻 आकाश जरी दृष्टीला सर्वव्यापी दिसत असलें, तरीं चैतन्याच्या दृष्टीनें अल्पदेशस्थितच आहे. या तत्वाचा विचार करूं लागलो, किंवा ऐकूं लागलो तर मोठी अडचण वाटते. म्हणून निवृत्तीनाथां, याचा उलगडा करावा. असें म्हटल्यावर त्यांच्या उपदेशानें, ते गुह्य मीं प्रत्यक्ष पाहिले; व यांचकरता मौनी, योगी लोक हिंडत असतात. ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ परिपूर्ण कुटस्थ आहे. त्या कुटस्थ स्वरूपाच्या ठिकाणी, अपूर्णही पूर्ण होतो. असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. 🌾🌴🌾🌴गुरुदेव दत्त🌾🌴🌾🌴

चहूं शून्याचा भेद कैसा पहावा देंही ।

Image
🌹🌾🌹अभंग ज्ञानदेवांचे🌾🌹🌾 चहूं शून्याचा भेद कैसा पहावा देंही । ब्रह्मरंध्री निःसंदेही निजवस्तू ।।१।। सावळे सुकुमार बिंदूचे अंतरी । अर्धंमात्रेंवरी विस्तारले ।।२।। त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट तिसरें । औटपिठादी सारें ब्रह्मांडासी ।।३।। स्थूल, सूक्ष्म, कारणी माया । महाकारणाच्या ठाया रीघ करा ।।४।। निवृत्ती ज्ञानदेव उभयतांचे बोंल । आकाश बुबुळी पाहा असें ।।५।। भाव..!🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻 या देहातच असून चारी अवस्थांचा मायिकपणा कसा ओळखावा?. व ब्रह्मरंध्रात असंदिग्धपणाने ती ब्रह्म वस्तू कशी पहावी?. ब्रह्मरंध्रातील त्या सूक्ष्म बिंदूतील अर्धंमात्रेत ही सावळी सुकुमार मूर्ती आहे. त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट, व औटपीठ ही महाकारण स्थाने आहेत. योगाभ्यासाने स्थूल, सूक्ष्म व कारण देहांचा निरास करून महाकारणात प्रवेश करा. निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर महाराज यांचे बोलही वरील अर्थाचे स्पष्ट आहेत. 🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺 🍃🌻🍃🌻🍃🌻गुरुदेव दत्त🌻🍃🌻🍃🌻🍃🌻

शून्याचा शेवट डोळा पाहा निराळा ।

Image
amrutanubhav 🍃🍂अभंग ज्ञानदेवांचे🍃🍂 🌾🌺🌻🌾🌺🌻🌾🌺🌻🌾 शून्याचा शेवट डोळा पाहा निराळा । नीळ बिंदू सांवळा प्रकाशला ।।१।। ब्रह्म ज्योतिरुप विसावले जेथ । अनुभव साद्यंत पहा तुम्ही ।।२।। ऐसें कैलासनाथे सांगितले पार्वती । ज्ञानदेवें निवृत्ती तेचि सांगे ।।३।। ‼️🕉️भावार्थ🕉️‼️ शून्यरुप जो नील बिंदू, त्याचा योगाभ्यासांने अनुभव घ्या. तो तेजोमय आहे, याचं ठिकाणी चैतन्यरूप ब्रह्म जणू काय विसावा घेण्याकरीता आले आहे. त्याचाही अनुभव घ्या. हेच रूप श्रीशंकराने पार्वतीला दाखवले व तेच निवृत्तीनाथांच्या कृपेने मला अनुभवण्यास मिळाले. असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ‼️ राम कृष्ण हरी ‼️ अमृतानुभव अध्याय पहिला

डोळांची पाहा डोळां शून्याचा शेवट ।

Image
🌾🌺🌾अभंग ज्ञानदेवांचे🌾🌺🌾 डोळांची पाहा डोळां शून्याचा शेवट । नीळ बिंदू नीट लखलखित ।।१।। विसावों आलें पातलें चैतन्य तेथें । पाहें पा निरुतें अनुभवें ।।२।। पार्वतीलागें आदिनाथें दाविलें । ज्ञानदेवें फावलें निवृत्तीनाथें ।।३।। भाव..🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺 ध्येय वस्तूमध्ये चित्ताची स्थिरता केली म्हणजे योग्यांना एक तेजस्वी निळा बिंदू दिसूतो, त्यात हे चैतन्य साठवलेले आहे, हे अनुभवाने नीट पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या गोष्टींचा अनुभव पार्वतीस शंकर कृपेनें व मला निवृत्तीनाथा च्या कृपेनें आला. 🌻🌺🌾गुरुदेव, गुरुदेव.🌾🌺🌻

नाम घेता वाया गेला । ऐसा कोणी ऐकीला।।

Image
।। श्री सद्गुरूनाथ महाराज की जय।। नाम घेता वाया गेला । ऐसा कोणी ऐकीला।। 🌻🌾🌺🌻🌾🌺🌻🌾🌺🌻🌾🌺🌻🌾🌺 एकदा सद्गुरूंना "परेपासून वैखरीपर्यंत करावे राम चिंतन" या चरणाचा अर्थ काय? " असे एका साधकाने विचारले. तेव्हा सद्गुरु म्हणाले, "ओठ व जीभ यांची हालचाल करून म्हणजेच वैखरीने नामस्मरण करणे बहुतेकांना सोपे, सोयीचे व लाभदायक असते. वैखरीनें नामघोष करायला अंशांत शक्ती लागते. ती सर्व परिस्थितीत टिक तेच असे नाही. साधकाला व्यवहारही सांभाळावा लागतो आणि त्यासाठी त्याला इतर बोलावे लागते. व्यक्तिगत किंवा समूहाने नामोच्चार करायला अशा तऱ्हेच्या मर्यादा असतात, म्हणून अखंडजपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मध्यमा, पश्यंती व परस्पर या वाणींनी जप करण्याचा अभ्यास करावा लागत असतो. हळुहळू सवयीने तोंड बंद असून आतल्याआत जीभ हालवून नामस्मरण होऊ लागते. अभ्यास आणखी वाढला म्हणजे नाम मध्यमेत येऊ लागते. जड व सूक्ष्म यांच्या मधली म्हणून या मध्यमा वाणीतून ओठ व जीभ यांची हालचाल नसते ; तर वाणीचे मेंदूतील जे केंद्र तेथे कामाचे सूक्ष्म स्पंदन चालू असते. तेथून या कामाला शारीरिक शक्ती आवश्यक ...