आतां झालों उतराई।

🚩🕉️‼️श्री विठ्ठल‼️🕉️🚩            🌺🌺अभंग🌺🌺
तुका म्हणे..

मजपुढें नाहीं आणीक बोलता।
ऐसें कांहीं चित्ता वाटतसे।।१।।

याचा कांहीं तुम्हीं देखावा परिहार।
सर्वज्ञ उदार पांडुरंगा।।२।।

कामक्रोधें नाहीं सांडिलें आसन।
राहिले वसोन देहामध्यें।।३।।

तुका म्हणे आतां झालों उतराई।
कळों यावें पायीं निरोपिलें।।४।।
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
     भावार्थ:- माझ्याप्रमाणें बोलका प्राणी कोणी नाहीं असें जें कांहीं माझ्या चित्तास वाटत आहे.
     तें नाहींसें करण्याचा हे पांडुरंगा, तुम्ही कांहीं विचार पाहा. तुम्ही सर्व जाणणारे उदार आहां.
     माझ्या देहाचे ठिकाणीं काम-क्रोधांनीं वास्तव्य केलें आहे. ते तें आसन सोडून कोठें जात नाहींत.
     तुकाराम महाराज म्हणतात,माझ्या अंत:करणाची जी स्थिती आहे ती तुमचे पायांजवळ ठेवून मी उत्तीर्ण झालों आहें हें आपल्याला कळावें.

   ⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्या शेवटीं देह तैसा ॥ १ ॥