हरीचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ।।१।।

🌷🌱अभंग नाथांचे🌱🌷

हरीचे ते दास ।
ज्यांचा पंढरीसी वास ।।१।।
येती नेमें पंढरीसी ।
दरूशन घेती विठ्ठलासी ।।२।।
करिती चंद्रभागे स्नान ।
पूर्वजा उध्दरतीं जाण ।।३।।
करिती गोपाळकाला ।
गोपाळपुरी मिळोनि मेळा ।।४।।
ऐसा जया घडे नेम ।
एका जनार्दनीं निष्काम ।।५।।
🌺🌾भावार्थ :-🌾🌺
हरीचे दास पंढरीस नित्यनेमाने येऊन विठ्ठलाचे दर्श़न घेतात. चंद्रभागेचे स्नान करुन लाभलेल्या पुण्यफलाने पूर्वजांचा उध्दार होतो. गोपाळपुरीं एकत्र जमून गोपाळकाला करतात. असा नेम ज्यांना घडतो ते भक्त निष्काम कर्मयोगी आहेत असे एकनाथ महाराज म्हणतात.
🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास