श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ
🔴अभंग चौदावा🔴
।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।।
हरि बोला देतां हरि बोला घेतां । हांसतां खेळतां हरि बोला ॥ १ ॥
हरि बोला गातां हरि बोला खातां । सर्व कार्य करितां हरि बोला ॥ २ ॥
हरि बोला एकांतीं हरि बोला लोकांतीं । देहत्यागाअंतीं हरि बोला ॥ ३ ॥
हरि बोला भांडतां हरि बोला कांडतां । उठतां बैसतां हरि बोला ॥ ४ ॥
हरि बोला जनीं हरि बोला विजनीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
🍀🌷🌻🍁 भावार्थ🍁🌻🌷🍀
देतांना, घेतांना, हसतांना, खेळतांना हरीचा जप करा. ।।१।।
गातांना, खातांना, फार काय, सर्व कामे करतांना हरीचा जप करा. ।।२।।
एकांतात, लोकांशी व्यवहार करीत असतांना व देह त्याग करण्याच्या शेवटच्या घटकेला हरी हरी म्हणा. ।।३।।
भांडताना, कांडतांना, उठतांना, बसतांना हरी हरी म्हणा. ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, जनात, वनात हरी म्हणा. ।।५।।
(तात्पर्य, मनुष्याने सर्वकाळ कोणतेही कार्य करीत असतांना हरी हरी म्हणावे.)
🌼🌻🙏आपला दासानुदास 🙏🌼🌻
Comments
Post a Comment