कुटुंबाचा केला त्याग|
🌷 *सार्थ तुकाराम गाथा*🌷
-----------------^---------‐---------
कुटुंबाचा केला त्याग|
नाही राग जव गेला||१||
भजन ते ओंगळवाणे|
नरका जाणें चुकेना||२||
अक्षराची केली आटी|
जरी पोटी संतनिंदा||३||
तुका म्हणे मागे पाय|
तया जाय स्थळासी||४||
""""""""""""""""""""""""""""""""""""
भावार्थ:- जोपर्यंत विषयांची आसक्ती गेली नाही. तोपर्यंत स्त्री-पुत्रदिकांचा त्याग केला, तरी त्याला काहीच अर्थ नाही.एखादा दुराचरणी हरिभजन करीत असला तरी त्याचे ते भजन पाप मिश्रित असल्यामुळे वाईटच होय.म्हणून त्यायोगे त्याचे नरकाला जायचे चुकणार नाही. वेद,शास्त्रे,पुराणे,
किंवा संतवचने घोकण्याचे पुष्कळ श्रम केले. पण अंतःकरणात संतांविषयी तिरस्कार असेल तर ते सर्व व्यर्थ होय. म्हणुन जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वर सांगितलेल्या प्रकारचे लोक मेल्यानंतर ज्यांचे उलटे पाय आहेत.
अशा असुरी योनीला प्राप्त होतात की ज्या योनीत हरिप्राप्तीच्या मार्गांपासून मागे पाय घेतला जातो. कारण ते फक्त हरिचिंतना पासुन अलिप्त राहिले.
🚩 *राम कृष्ण हरि* 🚩
Comments
Post a Comment