श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ

।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।।
       🔴अभंग सोळावा🔴
कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणे हरी ॥ १ ॥
दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥ २ ॥
इच्छावे ते जवळी चरण हरीचे । चरण सर्व नारायण देतो तुज ॥ ३ ॥
न सुटे कल्पना अभिमानाची गांठी । घेतां जन्म कोटी हरि कैंचा ॥ ४ ॥
एका जनार्दनीं सांपडली खूण । कल्पना अभिमान हरि झाला ॥ ५ ॥
🍀🌷🌻🍁भावार्थ🍁🌻🌷🍀
कल्पनेमुळे इच्छांचा जो साठा तयार झाला त्यामुळे गुंतडा ( अडथळा) निर्माण होतो, म्हणून हरी जाणला जात नाही. ।।१।।
दिल्याशिवाय फळाचा लाभ कसा होणार? हे बाबा ? नुसत्या कल्पनेने इच्छा करीत राहणे फुकट आहे. ।।२।।
देवाचे चरण जवळ असावे अशीच इच्छा करावी नारायण तुला सर्व देईल. ।।३।।
कल्पना व अभिमानाची गाठ जर सुटली नाही तर कोट्यवधी जन्म घेतले तरी हरीची प्राप्ती कशी होणार? ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरीचा जप करणे ही खूण मला सापडली व त्यायोगे माझ्या ठिकाणची कल्पना व अभिमान हरिरुप झाला. ।।५।।
🌼🙏आपला दासानुदास 🙏🌼

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास