देखावे चरण विठोबाचे ।

अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वार्ता न ये मना ।।१।।
सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथें उभा पाहे पांडुरंग ।।२।।
आटणी दाटणी मुंडणी सर्वथा । नाहीं पै तत्वतां यया तीर्था ।।३।।
करावें तें स्नान पुंडलिके वंदन । देखावे चरण विठोबाचे ।।४।।
जनार्दनाचा एका पंढरी सांडुनी । न जाय अवनीं कवण तीर्थीं ।।५।।
💦🌺-: भावार्थ :-💦🌺
पंढरी हे भुतलावरील चिरंतन टिकणारे शाश्वत क्षेत्र असून अद्वितीय आहे. येथे पांडुरंग भक्तांची वाट पहात उभा आहे. इतर क्षेत्रीं विधी-निषेधांची बंधन आहेत. पंढरींत केवळ भोळ्या भाबड्या मनाचा भक्तिभाव पुरेसा आहे. तीर्थांत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घ्यावें आणि विठोबाच्या चरणी नतमस्तक व्हावे . एकनाथ महाराज म्हणतात, पंढरी सोडून पृथ्वीवरील कोणत्याही तीर्थक्षेत्रीं जाण्याची ओढ वाटत नाही.
🚩🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩🚩

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास