एकाएकीं आतां असावेंसें वाटे।

🚩🕉️‼️श्री विठ्ठल‼️🕉️🚩
    💦🌺अभंग🌺💦
एकाएकीं आतां असावेंसें वाटे।
तरिच हे खोटे चाळे केले।।१।।

वाजवूनि तोंड घातलें बाहेरी।
कुल्प करूनी दारीं माजी वसा।।२।।
उजेडाचा केला दाटोनि अंधार।
सवें हुद्देदार चेष्टविला।।३।।

तुका म्हणे भय होतें तोंचि वरी।
होती कांही उरी स्वामिसेवा।।४।।
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
     भावार्थ..
हे देवा,
आतां तुम्हांला एकटे असावेंसें वाटतें म्हणूनच तुम्ही हा फसविण्याचा खोटा मार्ग स्वीकारला.
     देव निराकार आहे असें तुम्हीं आपले वेदमुखानें सांगून आम्हांला सगुण कल्पनेच्या बाहेर घालविलें आणि मायेचें कुलूप दारास लावून तुम्ही आंत लपून बसतां.
     तुमचे घरांत ज्ञानदीपाचा प्रकाश होता तो तुम्ही मुद्दाम घालवून अज्ञान अंधकार पाडला व आमचे बरोबर (संसारी जीवांबरोबर संतरूपी हुद्देदार किंवा) वेद हा हुद्देदार व्यवहार करावयास लावला, विधिनिषेधाचे नियम करते झालां.
तुकाराम महाराज म्हणतात, तुमचें आमचें स्वामिसेवकपणाचें नातें जोंपर्यंत होतें तोंपर्यंत आम्हीं तुमचें भय धरलें (आतां तुम्हीं-आम्हीं एकरूप झाल्यानंतर भयाचें कारण नाहीं).
💥💥💥💥💥💥💥💥💥💥
⛳🙏🏻 राम कृष्ण हरि🙏🏻⛳

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास