न जायेचि ताठा नित्य खटाटोप ।

।। ॐनमो सद्गुरू एकनाथाय नमः।।

     🔴अभंग आठरावा🔴
न जायेचि ताठा नित्य खटाटोप । मण्डुकीं वटवट तैसे ते गा ॥ १ ॥
प्रेमावीण भजन नाकाविण मोती । अर्थाविण पोथी वाचुनी काय ॥ २ ॥
कुंकवा नाहीं ठावे म्हणे मी आहेव । भावावीण देव कैसा पावे ॥ ३ ॥
अनुतापेवीण भाव कैसा राहे । अनुभवें पाहें शोधूनियां ॥ ४ ॥
पाहतां पाहणें गेलें तें शोधूनी । एका जनार्दनीं अनुभविलें ॥ ५ ॥
🌷🌻🍁भावार्थ🍁🌻🌷
(अध्ययनाचे) खटाटोप नेहमी चालू आहेत, पण अंगातील ताठा जर जात नसेल तर अरे, मग ते अध्ययन बेडकाच्या बडबडी प्रमाणेच आहे. ।।१।।
प्रेमाशिवाय भजन, नाकाशिवाय मोती व अर्थाशिवाय पोथी वाचणे हे फुकट नाही काय ?. ।।२।।
कुंकवाला तर ठिकाण नाही आणि मी सौभाग्यवती आहे असे म्हणते ! आणि तसा भाव तर नाही मग देव कसा प्राप्त होईल?. ।।३।।
अनुतापावाचून भाव कसा राहील? हे अनुभवाने तू शोधून पहा. ।।४।।
शोध करू गेले असता पाहणारा आणि पाहणे हे दोन्ही जातात. हे मी अनुभवले, असे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात. ।।५।।
🌼🙏आपला दासानुदास 🙏🌼

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास