अबोल्याने ठेला तुका |

‼️सार्थ तुकाराम गाथा ‼️

-------------------^----------------‐-
निघाले तें अंगीहूनि |
आतां झणी आतळे||१||
पळवा परपरते दुरी |
आता हरी येथूनि ||२|| 
धरिले तैसे श्रुत करा हो |
येथे आहो प्रपंची||३||  
अबोल्याने ठेला तुका |
भेउनि लोका निराळा||४||
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
भावार्थ:- माझ्या अंगातील सर्व विकार नाहीसे झाले.आता ते पुन्हा मला स्पर्श करतील असे काही घडू देऊ नकोस म्हणजेच संसाररूपी अग्नीतून बाहेर पडलेल्या मला पुन्हा त्या आगीची झळ बसू देऊ नका.हरी,आता ते दुःख पळवून लावा. जे माझ्या मनात आहे ,तेच कानावर पडू द्या. आम्ही तर प्रपंचातच आहोत. देवा तुम्ही तुमचे पतितपावन हे नाव सार्थ करा आणि माझा उद्धार करा.मी अखंड हरिचिंतन करीत राहील म्हणुन जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मी या लोकांना भिऊन त्यांच्यापासून निराळा राहिलो आहे .
🚩 राम कृष्ण हरि 🚩

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास