वेचावें तें जीवें।
तुका म्हणे...
वेचावें तें जीवें।
पूजा घडे ऐशा नांवें।।१।।
बिगारीची ते बिगारी।
साक्षी अंतरींचा हरी।।२।।
फळ बीजाऐसें।
कार्यकारणासरिसें।।३।।
तुका म्हणे मान।
लवणासरिखें लवण।।४।।
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
भावार्थ:-
आपला जीव देवाला समर्पण करणें ह्याचें नांव देवपूजा.
ह्यावांचून सर्व करणें बिगारीचें होतें. ह्यास अंतरसाक्षी हरि आहे.
जसें बीज तसें फळ प्राप्त होतें व कारणासारखें कार्य साध्य होतें.
तुकाराम महाराज म्हणतात,
ज्याच्या अंगीं जशी नम्रता असेल तसा देव त्याच्या ठिकाणीं नम्र होऊन त्याला मान देतो (मिठाचें कार्य खारटपणा आणणें, त्याप्रमाणें आपली पूजा जशी असेल तसें फळ मिळतें).
💥💥💥💥💥💥💥💥💥💥
⛳🙏🏻 राम कृष्ण हरि🙏🏻⛳
💐🙏🏻 पांडुरंग हरि🙏🏻💐
Comments
Post a Comment