श्री संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ
🔴अभंग तेरावा🔴
।।ॐ नमो सद्गुरू एकनाथाय नमः।।
ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटी दुःख कैंचें ॥ १ ॥
नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरि पवित्र तो ॥ २ ॥
पवित्र तें कुळ धन्य त्याची माय ।
हरि मुखें गाय नित्य नेमें ॥ ३ ॥
काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥ ४ ॥
वैष्णवांचें गुह्य काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥ ५ ॥
🌷🌻🍁 भावार्थ🍁🌻🌷
हरीला ओळखून त्याला आपल्या पोटात साठवले, अशाला हरीची भेट झाल्यावर आता दुःख कुठले. ।।१।।
पुरुष असो अथवा स्त्री असो, मग ते दुराचारी का असेनात ! जो मुखाने हरीचा जप करील तो पवित्रच होय. ।।२।।
जो नित्य नियमाने मुखाने हरीचा जप करतो त्याचे कुळ पवित्र होय व त्याला जन्म देणारी आईही धन्य होय. ।।३।।
ज्याच्या अंतःकरणात काम, क्रोध, लोभादि विकार आहेत असा मनुष्य येथे अधिकारी नाही. ।।४।।
जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरी स्मरण करणे हे जे वैष्णवांचे गुह्य आहे; ते मी निवडून काढले म्हणून तुम्ही हरी म्हणा..!!
🌻🙏आपला दासानुदास 🙏🌻
Comments
Post a Comment