घडती पुण्याचिया रासी ।

🌾🌱🌾 अभंग 🌱🌾🌱

घडती पुण्याचिया रासी ।
जे पंढरीसी जाती नेमें ।।१।।
घडतां चंद्रभागे स्नान ।
आणि दरूशन पुंडलिक ।।२।।
पाहतां विटेवरी जगदीश । पुराणपुरूष व्यापक ।।३।।
वारकरी गायी सदा ।
प्रेमे गौविंदा आळविती ।। ४ ।।
तया स्थळीं मज ठेवा. ।
आठवा जनीं जनार्दन ।।५।।
शरण एका जनार्दन ।
करा माझी आठवण ।।६।।
   💦🌾💦भावार्थ 💦🌾💦
जे भाविक नित्यनेमाने पंढरीची वारी करतात त्यांच्या पुण्याचा राशींनी संचय होतो . या भाविकांना चंद्रभागेचे स्नान घडते, भक्त पुंडलिकाचे दर्शन घडते. चराचरात व्यापलेल्या पुराणपुरुष जगदीशाचे ध्यान याच देही याचडोळां बघावयास मिळतें. वारकरी सतत विठुनामाचा घोष करुन देवाला आळवतात . त्यां पवित्र स्थळीं निवास लाभावा अशी इच्छा व्यक्त करुन एकनाथ महाराज सद्गुरु जनार्दन स्वामींना शरण जातात.

🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩

Comments

Popular posts from this blog

भक्त ऐसे जाणा जे देही उदास..

श्री एकनाथ महाराज कृत हरिपाठ

याजसाठी केला होता अट्टाहास